
महत्वपूर्ण रस्ते व विकास कामांचा समावेश
अमळनेर:-महाराष्ट्र शासन अर्थसंकल्प मार्च- 2026-27 मध्ये अमळनेर विधानसभा मतदारसंघात सुमारे 25 कोटी ची बरसात झाली असू सदर निधीतून मतदारसंघात महत्वपूर्ण रस्ते तसेच विविध विकासकामे मार्गी लागणार असल्याची माहिती माजी मंत्री तथा आमदार अनिल भाईदास यांनी दिली.

आमदार अनिल पाटील यांच्या प्रयत्नाने संपुर्ण मतदारसंघात दिवसेंदिवस विकासाचा आलेख वाढत असून रस्त्यांसह अनेक विकासकामे पूर्णत्वास आली आहेत तर अनेक कामे वेगाने सुरू असल्याचे निदर्शनास येत आहेत.या विकासामुळे मतदारसंघाचा चेहरा मोहरा बदलत आहे.या अर्थसंकल्पात देखील आमदार अनिल पाटील यांनी 25 कोटींचा भरीव निधी प्राप्त केल्याने सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे.
या विकास कामांसाठी निधी मंजूर,,
मेहेरगांव धुळे अमळनेर चोपडा खरगोन रस्ता रा.मा.क्र. 15 कि.मी. 67/00 ते 68/500 व 71/750 ते 72/740 आणि 73/500 ते 76/200 ची सुधारणा करणे ता. अमळनेर (भाग रेल्वे उड्डाणपुल ते दहिवद फाटा) एकूण रक्कम 6 कोटी, मुसळीफाटा धरणगांव अमळनेर शिंदखेडा रस्ता रामा. क्र. 6 कि.मी. 51/000 व 57/200 ची सुधारणा करणे ता. अमळनेर (भाग- भरवस ते रेल्वे बोगदा) एकूण रक्कम 4 कोटी, रा.मा. 39 ते जांभोरा ढेकू हेडावे अमळनेर शिरसाळे वावडे मांडळ रस्ता प्रजिमा 51 कि.मी. 29/600 ते 37/500 ची सुधारणा करणे ता. अमळनेर.(भाग- शिरसाळे ते वावडे) एकुण रक्कम 2.5 कोटी, बोळे मोंढाळे फ़ाफ़ोरे अमळनेर मारवड निम कपिलेश्वर रस्ता प्रजिमा 49 कि.मी. 49/00 ते 54/00 ची सुधारणा करणे ता. अमळनेर (भाग कळमसरे ते निम) एकूण रक्कम 2.5 कोटी, चोपडा चुंचाळे चौगाव लासूर कलाली निंभोरा पिंगळवाडे नंदगाव प्रजिमा-03 निंभोरा ते पिंगळवाडे गावांदरम्यान चिखली नदीवर पुलाला पोहोच रस्ता करणे कि.मी. 37/00 जव 45/500 ता.अमळनेर (भाग- कलाली ते मुडी प्र.अ.) एकूण रक्कम 2.5 कोटी, बोळे मोंढाळे फ़ाफ़ोरे अमळनेर मारवड निम कपिलेश्वर रस्ता प्रजिमा 49 कि.मी. 40/00 ते 44/00 ची सुधारणा करणे ता. अमळनेर (भाग धार ते मारवड) एकूण रक्कम 2.5 कोटी, बोळे मोंढाळे फ़ाफ़ोरे अमळनेर मारवड निंम कपिलेश्वर रस्ता प्रजिमा 49 कि.मी. 27/000 ते 29/000 ची मजबुतीकरणासह सुधारणा करणे ता. अमळनेर (रुबजी नगर ते हिंगोणा) 1 कोटी, बोळे मोंढाळे फ़ाफ़ोरे अमळनेर मारवड निम कपिलेश्वर रस्ता प्रजिमा 49 कि.मी. 33/300 ते 40/00 ची सुधारणा करणे ता. अमळनेर (भाग अमळनेर ते धार) एकूण रक्कम 2.5 कोटी, बोळे मोंढाळे बहादरपूर फाफोरे अमळनेर मारवड निम कपिलेश्वर रस्ता प्रजिमा-49 किमी 15/00 ते 17/800 मध्ये सुधारणा करणे ता. पारोळा एकूण रक्कम 1.5 कोटी अशी एकूण रक्कम 25 कोटीची कामे मंजुर झाली आहेत.
सदर निधीबद्दल आमदार अनिल पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे,श्रीमती सुनेत्रा पवार,ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन व जिल्ह्याचे पालकमंत्री ना गुलाबराव पाटील यांनी आभार व्यक्त केले आहेत.




