अमळनेर : तालुकयातील ब्रिटिश कालीन फापोरे बु.वळण बंधारा पाटचारीला लागणारे क्षेत्र निश्चितीसाठी गिरणा पाटबंधारे विभागाने भूमि अभिलेख कार्यालयात जमीन मोजणी फी ई चलनाने भरणा केला आहे. त्यामुळे आता वळण बंधारा पाटचारी दुरुस्ती कामाला वेग येणार असल्याचे संघर्ष समिती प्रमुख प्रा. गणेश पवार यांनी सांगितले.

बोरी नदीवरील ब्रिटिशकालीन फापोरे बु. वळण बंधारा पाटचारी दुरुस्तीच्या भुसम्पादनापोटी जलसंपादन विभागाकडून ५० टक्के रक्कम रुपये ४० लाख आधीच भुसंपादन तथा उपविभागीय अधिकारी कार्यालयाला प्राप्त झालेली आहे.मात्र पाटचारीसाठी प्रत्यक्षात कोणाचे किती क्षेत्र संपादन करावयाचे निश्चित नसल्याने ५० टक्के मोबदलापासून शेतकरी वंचित होते. पाटचारीचे काम देखील सुरु होतं नव्हते.प्रा. गणेश पवार यांनी या बाबतीत संघर्षाची भूमिका घेतल्याने अखेर कार्यकारी अभियंता गिरणा पाटबंधारे विभाग जळगाव यांनी भूमिअभिलेख कार्यालयात गांवनिहाय क्षेत्र मोजणी फी भरली आहे. यात पाटचारीत येणारे हिंगोणे बु.गावाच्या जमीन मोजणी पोटी फी रु. ८१ हजार फापोरे गावासाठी रु. दोन लाख १४हजार ५०० तर अमळनेर भागासाठी रु. ९१ हजार ५०० या प्रमाणे मोजणी फी रक्कम अमळनेर भूमि अभिलेख कार्यालयात मिळालेली आहे. उपअधीक्षक भूमि अभिलेख कार्यालय अमळनेर यांनी वरील तीनही गावांचे अधिग्रहित क्षेत्र मोजणी नंतर बाधित शेतकऱ्यांना ५० टक्के मोबदला वाटप होईल.या पाटचारी कामात कोठेही वन क्षेत्र मोडत नसल्याने कामाला गती मिळणार आहे बोरी नदीवरून फापोरे बु. गावाला वळण देत ब्रिटिश कालीन पाटचारीचे पुनःरुज्जीवन करून थेट धार -मालपूर पांझर तलावात पाणी आणण्यासाठी प्रा. गणेश पवार तब्बल दहा वर्षांपासून संघर्ष करीत आहेत. हा प्रयोग यशस्वी झाल्यास पांझर तलावात बाराही महिने जलसाठा राहील. बारा गावांची पाणी टंचाई. मिटेल. सिंचन क्षेत्र वाढ होईल



