
अमळनेर:- महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाच्या शासन निर्णयानुसार, गतिमान प्रशासन व आपत्कालीन व्यवस्थेचे बळकटीकरण योजनेअंतर्गत छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर दिनांक 07 मार्च रोजी फाफोरे बु येथे संपन्न झाले.

या शिबीराचे उद्घाटन खासदार स्मिता वाघ, जिल्हा पुरवठा अधिकारी महेश चौधरी, तहसीलदार रुपेशकुमार सुराणा यांच्या हस्ते संपन्न झाले. या वेळी विविध प्रशासकीय विभागांचे अधिकारी,स्थानिक लोकप्रतिनिधी, विविध तालुका स्तरीय शासकीय अधिकारी व विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
◾ शिबीरामध्ये दिले गेलेले ठळक लाभ
▪️ पुरवठा शाखा – 115 नवीन/दुबार शिधापत्रिका
▪️ संगायो शाखा – 147 लाभार्थ्यांची DBT प्रक्रिया पूर्ण, 22 हयात प्रमाणपत्रे, 21 नवीन अर्ज
▪️७/१२ दुरुस्ती – 51
▪️वारस नोंदी – 11
▪️ सेतु शाखा – 212 उत्पन्न, 61 राष्ट्रीयत्व, 157 रहिवासी, 53 जातीचे दाखले वाटप, 10 आधार नोंदणी, 17 आधार दुरुस्ती
▪️ बालविकास विभाग – 04 लाभार्थ्यांना बेबी कीट वाटप
▪️फेरफार नोंदी निकाली – 7
▪️कृषी विभाग- ट्रक्टर वाटप – 2 लाभार्थी
शिबिराच्या ठिकाणी विविध प्रशासकीय विभागांचे माहितीपर प्रदर्शनीय टेबल लावण्यात आलेले होते.
एकूण 850–900 नागरिकांची उपस्थिती नोंदवली गेली.
यावेळी खासदार स्मिता वाघ मार्गदर्शनपर मनोगत व्यक्त केले. तहसीलदार रुपेशकुमार सुराणा यांनी प्रस्तावना मांडली. निवासी नायब तहसिलदार सी यु पाटील यांनी उपस्थितांचे आभार मानले.



