
ग्रीन ग्रुप व पत्रकार संघातर्फे क्रिकेटप्रेमींसाठी विशेष आज व्यवस्था
अमळनेर : भारत आणि न्यूझीलंड यांच्यात ८ मार्च रविवारी संध्याकाळी ७ वाजता होणाऱ्या २०-२० क्रिकेट फायनल सामन्याचा थरार क्रिकेटप्रेमींना एकत्रितपणे अनुभवता यावा यासाठी अमळनेरमध्ये मोठ्या एलइडी स्क्रीनवर थेट प्रक्षेपणाची व्यवस्था ग्रीन ग्रुप, अमळनेर व अमळनेर शहर व तालुका पत्रकार संघ यांच्या कडून राज भवन समोर,तहसील कचेरीच्या येथे बाजूला,करण्यात आली आहे.

या रोमांचक सामन्याचा आनंद शहरातील क्रिकेटप्रेमींना सामूहिकरीत्या घेता यावा, यासाठी ग्रीन ग्रुप, अमळनेर व अमळनेर शहर व तालुका पत्रकार संघ यांनी पुढाकार घेतला आहे. क्रिकेट हा भारतातील सर्वाधिक लोकप्रिय खेळ मानला जातो. भारत व न्युझीलँड यांच्यातील अंतिम सामना असल्याने या लढतीकडे देशभरातील क्रीडारसिकांचे लक्ष लागले आहे. सामन्यातील प्रत्येक चेंडू, चौकार-षटकार आणि उत्कंठावर्धक क्षण मोठ्या स्क्रीनवर पाहण्याचा आनंद काही वेगळाच असतो. याच पार्श्वभूमीवर अमळनेरमधील क्रिकेटप्रेमींना एकत्र येऊन सामना पाहता यावा यासाठी मोठ्या एलइडी स्क्रीनची विशेष व्यवस्था करण्यात आली आहे.
या उपक्रमामुळे मित्रमंडळी, व क्रिकेटप्रेमी ग्रुपने एकत्र येऊन सामन्याचा आनंद घेऊ शकतील. सामन्यादरम्यान उत्साहाचे वातावरण निर्माण होण्याची शक्यता असून शहरातील तरुणाईत याबाबत विशेष उत्सुकता दिसून येत आहे. ग्रीन ग्रुप, अमळनेर व अमळनेर पत्रकार संघ यांनी शहरातील सर्व क्रिकेटप्रेमींना या सामन्याचा थरार मोठ्या एलइडी स्क्रीनवर अनुभवण्यासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे. एकत्र बसून भारताच्या विजयासाठी जल्लोष करत सामन्याचा आनंद लुटावा, असेही आयोजकांनी सांगितले आहे.



