
अमळनेर:- तालुक्यातील कळंबु येथील पांझरा नदीपात्रातून अवैध वाळू उपसा करणारे ट्रॅक्टर मारवड पोलिसांनी पकडत दोघांवर गुन्हा दाखल केला आहे.

हेडकॉन्स्टेबल दिनेश पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून, ५ रोजी सकाळी ५:३० वाजता कळंबु शिवारातील पांझरा नदीपात्रात अवैध वाळू उपसा करून चोरटी वाहतूक करताना विना क्रमांकाचे एक ट्रॅक्टर मिळून आले. एक लाख वीस हजार रुपये किमतीचे ट्रॅक्टर व ट्रॉली असता मुद्देमाल जप्त करण्यात आला असून ट्रॅक्टर चालक करण मंगा भील (वय २२ वर्ष रा. बेटावद) व दीपक (पूर्ण नाव गाव माहित नाही) अशा दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सफौ सुनील पाटील हे करीत आहेत.




