
रॉकस्टार स्वामी तोलानी,सिंगर हरी तोलानी व टीम पोहोचली आफ्रिकेत…
अमळनेर:-इंटरनॅशनल संगीत प्रोग्राम सिएरा लिओन अफ्रिका येथे आयोजित केला असून यासाठी अमळनेर येथील सुप्रसिद्ध गायक आफ्रिकेत पोहोचले असून तेथे उत्कृष्ठ सादरीकरण करीत आहेत.

काल सोमवार, दि.16 मार्च ते मंगळवार 24 मार्च पर्यंत आयोजित प्रोग्राम मध्ये अमळनेरचे स्वर तेथील श्रोत्यांना एकविले जाणार आहेत.यात अमळनेरचे सुप्रसिध्द 21 वर्षीय गायक रॉकस्टार स्वामी तोलानी आणि सुप्रसिध्द सिंगर हरी तोलानी यांचा अफ्रिका मध्ये बॉलीवुड नाईट, भजन संध्या, माता की चौकी, चेट्रीचंद्र सिंधी महोत्सवचा बहारदार कार्यक्रम होणार आहे. त्यांच्या सोबत टिनचे कलाकार नितीन गुरव आणि जयेश संदानशिव यांचीही साथ संगत त्यांना मिळणार आहे.सदर आयोजनाबद्दल संपूर्ण जळगांव जिल्ह्यासह अमळनेर शहरातील आणि खान्देश मधील सर्व समाजबांधव आणि मित्र परिवाराकडून रॉकस्टार स्वामी तोलानी आणि सिंगर हरी तोलानी यांच्या संपूर्ण टिमवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.याआधी देखील विदेशात त्यांचे कार्यक्रम झाले आहेत.रॉकस्टर स्वामी व सिंगर हरी तोलानी हे अमळनेर येथील मधु हार्डवेअर चे संचालक जितेंद्र तोलानी यांचे पुतणे व बंधू आहेत.




