
एकूण ३ कोटी १४ लाख ४१ हजार रुपयांची वसुली…
अमळनेर : तालुका विधी सेवा समितीतर्फे आयोजित राष्ट्रीय लोकअदालतीत ३७३९ केसेस पैकी १५२ निकाली निघाल्या असून एकूण ३ कोटी १४ लाख ४१ हजार २०३ रुपये वसुली झाली आहे.

न्यायालयातील प्रलंबित खटल्यानंतरच्या ५ हजार ४८९ पैकी १४५३ केसेस लोकन्यायालयात ठेवण्यात आले. त्यापैकी ११६ केसेस निकाली निघाले तर २ कोटी ८२ लाख २५ हजार १९२ रुपये वसूल झाले.
तर खटलापूर्व केसेस मध्ये २३१६ केसेस लोकन्यायालयात ठेवण्यात आल्या. त्यापैकी ३६ केसेस निकाली निघाल्या. त्यात ३२ लाख १६ हजार ११ रुपये वसूल करण्यात आले.
जिल्हा न्यायाधीश सी व्ही पाटील , सह दिवाणी न्यायाधीश के ई चौगुले , सह दिवाणी न्यायाधीश एन आर यलमाणे असे तीन पॅनल होते. पंच म्हणून ऍड अमृता देसले , ऍड व्ही वाय विंचूरकर , रमेश देशपांडे यांनी काम पाहिले. लोकन्यायालय पार पाडण्यासाठी वकील संघाचे अध्यक्ष ऍड गोपाळ सोनवणे , उपाध्यक्ष राकेश बिऱ्हाडे , सचिव उदय शिसोदे , अधीक्षक सी डब्ल्यू बिऱ्हाडे , वरिष्ठ सहाययक बी एस पांडव ,कनिष्ठ सहायक ए एस कोठावदे ,एन ए पाटील , एम एच साळुंखे , पी टी पाटील , सरकारी वकील ऍड किशोर बागुल , राजेंद्र चौधरी यांनी सहकार्य केले.




