
चैत्रोत्सव व गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर दिनांक 18 ते 25 दरम्यान गावात भक्तीमय वातावरण
अमळनेर:- तालुक्यातील निम येथे चैत्रोत्सव व गुढीपाडव्याच्या हिंदू नवीन वर्षाच्या स्वागताची सुरुवात भक्तीमय वातावरनात हरिणाम सप्ताहाणे होणार असून तुकोबा गाथा पारायण करण्याचे हे 68 वे वर्ष असून परंपरा नुसार निम ग्रामस्थ व भजनी मंडळाच्या सहकार्याने पूर्ण सप्ताह भक्तीमय वातावरण गावात निर्माण होणार आहे.

यात गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशी दिनांक 18 रोजी दुपारी २ वाजता विठ्ठल मंदिराच्या नियोजित जागी विठ्ठल रुक्मिणी मूर्त्याची विधिवत पुरोहितांचे हस्ते प्रतिष्ठापना करून अखंड हरिनाम कीर्तन सप्ताह व चैत्रोत्सवाला सुरुवात होईल, दररोज सकाळी ५ ते ६ काकडा आरती होऊन 8 ते 10 व दुपारी 3 ते 5 ग्रंथराज तुकोबा गाथा पारायण, सायंकाळी ५ ते ६ हरिपाठ व ६ ते ६:३० सांज आरती होईल तर रात्री ८ ते १० या वेळी आळंदी येथील नामवंत कीर्तनकारांचे जाहीर कीर्तन होईल, कीर्तन सप्ताहात यासाठी दिनांक 18 रोजी हभप तुकाराम महाराज ( चिंचोलकर ) , दिनांक 19 रोजी गुढीपाडव्याच्या दिवशी हभप नारायण महाराज ( भडणेकर ) , दिनांक 20 रोजी हभप किशोर महाराज( अकोलेकर ), दिनांक 21 रोजी हभप विशाल महाराज ( बोरनारकर ), दिनांक 22 रोजी हभप रवींद्र महाराज ( दहिवेलकर ), दिनांक 23 रोजी हभप अतुल महाराज ( नारणेकर ) , दिनांक 24 रोजी दुपारी ४ वाजता ग्रंथाची व मूर्त्याची पालखी मिरवणूक व दिंडी सोहळा होईल व रात्री हभप राजेंद्र महाराज ( केकतनिंभोरेकर ) यांचे जागराचे कीर्तन व दिनांक 25 रोजी हभप भानुदास महाराज (भुसावळकर)यांचे पहाटे ९ ते ११ या वेळेस काल्याचे कीर्तन होऊन महाप्रसाद वाटप होऊन कीर्तन सप्ताहाची सांगता होईल तरी भाविकांनी कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन विठ्ठल मंदिर प्रतिष्ठान व निम ग्रामस्थांनी व भजनी मंडळाने केले आहे.




