
अमळनेर:-हिंदु धर्म, हिंदू संस्कृती आणि हिंदु समाज यांचे संरक्षण करून आपल्या भारत मातेला परमवैभवी घेऊन जाण्याचा संकल्प करण्यासाठी सकल हिंदू समाज (पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर वस्ती,पैलाड )यांच्या वतीने भव्य हिंदू संमेलनाचे आयोजन आज गुरुवार दिनांक 19 रोजी शिवाजी नगर पैलाड येथे केले आहे.

तरी सर्व हिंदू बंधू, भगिनी व मातृशक्तीने मोठ्या संख्येने या संमेलनात सहकुटुंब सहभागी व्हावे अशी विनंती आयोजन समितीतर्फे करण्यात आली आहे.सदर संमेलन रात्री 8 ते 10 या वेळेत होणार असून यावेळी प्रमुख अतिथी म्हणून संत श्री. प. पू. ह.भ.प. प्रसाद महाराज (संत सखाराम महाराज संस्थान, अमळनेर) श्री. श्री. महामंडलेश्वर महंत १००८ श्री. ईश्वरदासजी महाराज (श्रीक्षेत्र नंदगांव, ता. अमळनेर) तर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सुरेश भगवान बाविस्कर(सचिव, मंगळग्रह सेवा संस्था, अमळनेर) असतील.तसेच प्रमुख वक्ते श्रीकांत सुभाष पाठक (प्रांत सहसंयोजक, शिवशंभु विचार मंच) हे असणार आहेत.सदर कार्यक्रम भवानी माता मंदीर (शिवाजी नगर) पैलाड, अमळनेर येथे होणार आहे. तर भव्य मशाल यात्रा सायंकाळी 6 वाजता पैलाड दरवाजा चौक ते भवानी माता मंदीरापर्यंत काढण्यात येणार आहे.




