
अमळनेर : चुलत वहिनीला तू मला खूप आवडते असे बोलल्याने भडगाव तालुक्यातील तिघांनी तालुक्यातील तरुणाला व त्याच्या आईला लोखंडी रॉड ने मारल्याची घटना १५ रोजी सकाळी साडे दहा वाजेच्या सुमारास घडली.

आनोरे येथील पंकज सुदाम पाटील याने आपल्या चुलत वहिनीला तू मला खूप आवडते म्हणून बोलल्याने महिलेला व तिच्या नातेवाईकांना राग आला. महिलेचे भवरखेडा ता धरणगाव येथील नातेवाईक बापू पाटील पंकज याला आपल्या घरात तू असे करतो का म्हणून समजावत असताना भावड्या पाटील , भूषण पाटील दोन्ही (रा भातखंडे ता भडगाव) व बंटी पाटील (भडगाव) हे पंकजला लाथा बुक्क्यांनी मारू लागले. भूषण याने लोखंडी रॉड ने पंकजच्या पायावर जोरजोराने मारन पाय फ्रॅक्चर केला . त्याचवेळी पंकज ची आई मिनाबाई सुदाम पाटील भांडण सोडवायला गेली असता भूषण याने लोखंडी रॉडने तिच्या हातावर वार केला. तिघांविरुद्ध महिलेने फिर्याद दिल्यावरून अमळनेर पोलीस स्टेशनला भारतीय न्याय संहिता कलम ११८(२),११५(२) ,३५२,३(५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास हेडकॉन्स्टेबल कैलास शिंदे करीत आहेत.




