
अमळनेर : कॉपी पुरविण्यास नकार दिल्याने दोघांनी एका होमगार्डला लोखंडी रॉड ने मारून जखमी केल्याची घटना १४ रोजी भारत गॅस गोडाऊन जवळ घडली.

भूषण पाटील रा डी डी नगर याचा भाऊ पियुष पाटील याची परीक्षा एन टी मुंदडा माध्यमिक विद्यालयात सुरू होती त्याला कॉपी पुरवण्यासाठी भूषण याला शाळेत जायला मदत कर असे अनिकेत राजेंद्र पाटील रा डी डी नगर याने होमगार्ड राकेश पुरुषोत्तम चौधरी याला सांगितले. मात्र होमगार्ड ने नकार दिल्याने अनिकेत ने त्याला शिवीगाळ करत खाली पाडले आणि भूषण ने पकडून ठेवले. अनिकेतने लाथाबुक्क्यांनी मारहाण करून लोखंडी रॉड ने डोक्यात मारण्याचा प्रयत्न केला पण होमगार्ड ने वार चुकवल्याने तो त्याला चेहऱ्यावर लागला. याबाबत उशिराने अमळनेर पोलीस स्टेशनला फिर्याद दिल्याने अनिकेत व भूषण विरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ११७(२) , ११५(२), ३५(१)(२) ,३५२प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास हेडकॉन्स्टेबल संदेश पाटील करीत आहेत.




