
अमळनेर : तालुक्यातील रणाईचे येथील एका ऑनलाईन NCMC कार्ड एजंटवर प्रशासनाने कारवाई केली आहे. नागरिकांकडून आलेल्या तक्रारीनंतर हा प्रकार उघडकीस आला असून संबंधित एजंटकडून कार्डासाठी जादा शुल्क आकारले जात असल्याचे समोर आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, NCMC कार्डसाठी अधिकृत शुल्क १९९ रुपये (नोंदणी शुल्क १६८ रुपये व १८ टक्के जीएसटी ३१ रुपये) इतके असताना संबंधित दुकानदार नागरिकांकडून ३०० रुपये घेत होता. यामुळे संतप्त नागरिकांनी मुंबई सेंटर येथील एसटी च्या आँफिस ला ऑनलाईन तक्रार दाखल केली होती.
सदर तक्रार हि वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून जळगाव आगाराला कळविल्यानंतर जळगाव विगाग चे दिलीप बंजारा यांनी अमळनेर आगार व्यवस्थापकांकडे हि तक्रार दिली त्या नंतर आगार व्यवस्थापक अमळनेर त्यांनी तत्काळ दखल घेत स्थानक प्रमुख अनिकेत न्हायदे यांना रणाईचे येथे पाठवले. प्रत्यक्ष चौकशीदरम्यान तक्रार खरी असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर संबंधित एजंटचे मशीन जप्त करून आगारात आणण्यात आले.
या कारवाईनंतर आगार व्यवस्थापक प्रमोद चौधरी व स्थानक प्रमुख अनिकेत न्हायदे यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, NCMC कार्डसाठी १९९ रुपयांपेक्षा जास्त शुल्क आकारले जात असल्यास त्वरित अमळनेर आगारात लेखी तक्रार द्यावी. अशा एजंटविरोधात कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.




