
अमळनेर:- शहरातील मुंदडा नगर -१ जवळील कस्तुराबाग नगर येथील शांताराम महाजन यांची होंडा शाईन कंपनीची मोटार सायकल चोरी झाल्याची घटना आज दि. २२ रोजी रात्री सुमारे अडीच वाजता झाली.

कस्तुरा बाग नगर येथील प्रा. नितीन शांताराम चव्हाण यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांचे वडील शांताराम माणका महाजन यांची होंडा शाईन कंपनीची एम. एच.१९ ए. वाय. ६१६७ क्रमांकाची गाडी रात्री अडीच वाजेच्या सुमारास चोरी झाली. प्रा. नितीन चव्हाण यांनी अंगणात मोटार सायकल लॉक करून पुढच्या चाकाला साखळ दंडाने बांधलेली होती. गाडीचे लॉक चोरांना तोडता न आल्याने त्यांनी अंगणातून मोटार सायकल उचलून नेली. ही घटना सी. सी. टी. व्ही मध्ये कैद झाले असून दोन चोरांनी मोटार सायकल उचलून नेली. तर तिसरा चोर पुढे काही अंतरावर लक्ष ठेऊन असल्याचेही दिसून येत आहे.सकाळी साडे सहा वाजता त्यांच्या लक्षात आल्याने प्रा. नितीन चव्हाण यांनी अमळनेर पोलीस ठाण्यात मोटार सायकल चोरी झाल्याची नोंद केली असून पुढील तपास पोलीस हेड कॉस्टेबल मिलिंद सोनार हे करीत आहेत.




