
अमळनेर : दोन मोटरसायकलची समोरासमोर धडक होऊन निमझरी येथील ३५ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना २२ रोजी दुपारी साडे चार वाजता ढेकू रस्त्यावर माऊली पॉलिटेक्निकजवळ घडली.

निमझरी येथील शांताराम दशरथ भिल वय ३५ हा आपली मोटरसायकल क्रमांक एम एच १९ आर ७७४९ हिच्यावरून जात असताना समोरून येणारी मोटरसायकल क्रमांक एम एच १९ डी एच ११४३ हिच्यावरील चालक विशाल सुखदेव भामरे रा जवखेडा याने रॉन्ग साईडने वेगात येऊन जोरदार धडक दिली. यात शांताराम याचा जागीच मृत्यू झाला. मयताच्या भावाने विनोद दशरथ भिल याने फिर्याद दिल्यावरून अमळनेर पोलीस स्टेशनला भारतीय न्याय संहिता कलम १०६(१) ,२८१ ,१२५(अ),१२५(ब), मोटरवाहन कायदा कलम १८४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास हेडकॉन्स्टेबल काशिनाथ पाटील करीत आहेत.




