
अमळनेर – तालुक्यातील चिमनपुरी पिंपळे परिसरात चोरांनी पुन्हा एकदा डोके वर काढले असून, पिंपळे आर्डी रस्त्यावरती रस्त्यालगत शेतामध्ये सौर ऊर्जा पंप मोटर व वायर लंपास केली आहे. याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पिंपळे येथील दाजीबा अर्जुन पाटील (वय ७३) राहातात. २१ मार्च रोजी पहाटे अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या गट नंबर८७/२ शेतातील विहिरी मधून इकोझेन सोल्युशन्स कंपनीची पाण्याची मोटर चोरून नेली. सकाळी उठल्यावर ते शेतात गेल्यानंतर निदर्शनास येताच दाजीबा अर्जुन पाटील यांनी संपूर्ण परिसरात आणि ओळखीच्या ठिकाणी शोध घेतला. मात्र, शोध घेऊनही सौर ऊर्जेची पंपाची मोटर मिळून न आल्याने अखेर त्यांनी २१ मार्च रोजी पोलिस ठाणे गाठून तक्रार दिली. या घटनेचा तपास अंमलदार कैलास शिंदे करत आहेत.




