
अमळनेर : एस टी प्रवास सवलतीसाठी लागणाऱ्या एनसीएमसी कार्ड देताना सामान्य नागरिकांना लुटणाऱ्या आणखी दोन एजंट विरुद्ध कारवाई करण्यात येऊन त्यांचे मशीन जप्त करण्यात आले आहे.

१२ वर्षावरील महिला आणि जेष्ठ व अमृत जेष्ठ नागरिकांसाठी आता एसटीने एनसीएमसी कार्ड आवश्यक केलेअसून त्यासाठी प्रत्येक आगारात तसेच खाजगी एजंट नेमण्यात आले आहेत. प्रत्येक कार्ड साठी शासनाने १९९ रुपये फी ठरवून दिलेली असताना एजंट नागरिकांकडून सुमारे ३०० रुपये फी घेऊन ग्राहकांची लुबाडणूक करीत असल्याच्या तक्रारी विभाग नियंत्रक दिलीप बंजारा यांच्याकडे प्राप्त झाले होत्या. त्यानुसार त्यांनी वाहतूक निरीक्षक देशमुख ,चोपड्याचे आगार प्रमुख पाटील यांना कारवाई करण्यास सांगितले होते.
अमळनेर येथे माया शिवदे याना अमळनेर बसस्टँड वर एजन्सी देण्यात आली होती मात्र ते ठराविक ग्राहक करून त्यांनी जळोद येथे जादा दराने ग्राहकांची लुबाडूक करीत असल्याचे निदर्शनास आल्याने त्यांच्याकडील मशीन जप्त करून कारवाई करण्यात आली. तसेच चोपडा येथे देखील बसस्थानकावर कुणाल गायकवाड या एजंटने बसस्थानकावर ग्राहकांची लूट केल्याचे निदर्शनास आल्यावर त्यांचे मशीन जप्त करून कारवाई करण्यात आली.




