
सुरुवातीपासून वादातीत ठरलेल्या कामाच्या गुणवत्तेवर प्रशासनाकडून दुर्लक्ष…
अमळनेर:-येथील शहराला जोडणारा रिंग रस्त्याचे काम सुरु असून त्या कोट्यावधी रुपयांच्या कामाला पाणी टंचाईची झळ बसल्याचे चित्र असून ठेकेदार आणि प्रशासनाचे या कामाकडे पूर्णपणे दुर्लक्ष होत असल्याचे वारंवार दिसून आले आहे.

सध्यस्थीतीत रिंग रोड वर मध्यभागी डिव्हायडर बनवण्याचे काम प्रसाद नगर ते मुंदडा गेट पर्यंत सुरु आहे. सुरवातीपासूनच वादात्मक ठरलेला हा रस्ता ठेकेदाराने कामात गुणवत्ता न ठेवल्याने असाच पूर्णतःवास येत आहे. रस्त्याच्या मध्यभागी डिव्हायडर टाकण्याचे काम सुरु असून या कामावर थेंब भर ही पाणी मारले नसल्याचे दिसून आले असून आजू बाजूला राहत असलेले रहिवासी यांनी या रस्त्याच्या कामाला पाणी टंचाईच्या झळा बसत असल्याचा उपरोधात्मक टोलाही मारला आहे. मात्र याकडे जबाबदार अधिकारी, लोकप्रतिनिधी यांचे दुर्लक्ष होत असल्याचाही आरोप होत आहे.
रस्त्याचे काम सुरु असताना याची झळ रहिवाशी लोकांना गेल्या वर्षे भरापासून बसत आहे. डिव्हायडरचे काम सुरु असताना वाळू ही कामाच्या सोयीनुसार टाकली जात असताना या रस्ता पार करताना मात्र आबाल वृद्धाच्या जीवाशी खेळले जात आहे. मुंदडा नगर एक गेट जवळील रस्त्यावर ज्याठिकाणी रस्ता एकीकडून दुसरीकडे पास होतो त्याच ठिकाणी वाळू टाकल्याने मागच्या आठवड्यात लहान मोठेअपघात ही झाले आहेत. तर कॉलनीतील रस्ता खाली अन ऐंशी फुटी रस्ता वरती यामुळे दोन रस्त्यावर जोडणाऱ्या भागाला याच रस्त्यावर वापरलेला सिमेंट खडी, वाळूचा माल टाकून व्यवस्थीत उतार करणे गरजेचे असताना मात्र लोकांचे हाल होत असूनही आंधळं दळतंय अन कुत्र पीठ खात असल्याचा प्रकार या कामात असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. याबाबत तात्काळ लक्ष घालून या कामाची चौकशी करण्यात यावी.
चौकट
कामाची गुणवत्ता तपासावी—–
. या कामावर सुरुवातीपासून पाणी पूर्णता मारले गेले नसल्याने या कामाची गुणवता ढासाळलेली आहे. तर आता होत असलेल्या डिव्हायडरला तर पाणीच मारले नसल्याने या कडक उष्णतेत हे कोट्यावधी रुपयांचे काम मातीमोल झाले असल्याचेही बोलले जात असून या कामाची चौकशी करुण्यात यावी अशी मागणी होत आहे.




