
अमळनेर तालुक्यातील शिरूड गावाची जिल्हा बँक कर्ज 100% फेड करण्याची परंपरा कायम ठेवली सोसायटीचे 2 कोटी 95 लाख 33हजार वाटप कर्ज 31 मार्चला शेतकऱ्यांनी भरणा केल्याने बँकेचे कर्ज पूर्ण भरलेजाऊन सोसायटीच्या करंट खात्यात उर्वरित पैसा जमा झाला .

संस्थेची गावात प्रशस्त अशी भव्य सागवान इमारत आहे स्वस्थेच्या इमारतीतच जिल्हाबँक शाखा आहे,स्वस्थेचे गावात स्वस्त धान्य दुकान,दुकान संकुल आहेत.. सन 2025 – 26 वर्षी 100% कर्ज फेड होण्यासाठी चेअरमन अरुण पाटील , व्हॉईस चेअरमन सविता पाटील ,संचालक प्रा सुभाष पाटील, बापुराव महाजन ,गोरख धनगर,धोंडू मास्तर, अनंतराव मोरे,सुभाष महाजन,सीताराम पाटील,भास्कर पाटील, वासुदेव पाटील ,तिलोत्तमा पाटील,शाम पाटील, ,मीराताई पाटील तसेच सेक्रेटरी रविंद्र आप्पा,सेल्समन वीरभान जीभू, बापू मोरे,बँकेचे व्यवस्थापक शेषराव साहेब,सोनवणे साहेब ,आहिराव साहेब ,भाऊसाहेब पाटील,प्रफुल पाटील सुपडू पाटील ,वसंत पाटील , नंदू पाटील सर्वांचे हातभार कामी आले.




