
अमळनेर बाजार समितीतही महाप्रसादाचे भव्य नियोजन
अमळनेर :- शहरातील श्री डुबकी मारोती मंदिर येथे दरवर्षाप्रमाणे यंदाही हनुमान जयंतीनिमित्त भव्य जन्मोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.याशिवाय कृषी उत्पन्न बाजार समितीतही महाप्रसादाचे भव्य नियोजन करण्यात आले आहे.

डुबकी मारुती येथे पहाटे ५.३० वाजता भगवान हनुमान जन्मोत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरा केला जाणार आहे.या धार्मिक कार्यक्रमानिमित्त सकाळी ११ ते दुपारी २ वाजेपर्यंत महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली असून, सर्व भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून प्रसादाचा लाभ घ्यावा,असे आवाहन करण्यात आले आहे.
हा कार्यक्रम श्री डुबकी मारोती मंदिर,अमळनेर येथे आयोजित करण्यात आला असून, श्री डुबकी हनुमान संस्थानतर्फे सर्व तयारी करण्यात आली आहे.तरी सर्व भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन बजरंगलाल अग्रवाल परिवार व सहकाऱ्यांनी केले आहे.
बाजार समितीतही मोठे नियोजन
कृषी उत्पन्न बाजार समितीत असलेल्या मारुती मंदिरावर मोहन कृषी उद्योग चे गोविंद अग्रवाल आणि रवी ट्रेडिंगचे कपिल कमल दलाल यांच्या विशेष सहयोगाने श्री हनुमान जन्मोत्सव व महाप्रसादाचे मोठे आयोजन सकाळी 11 वाजेपासून करण्यात आले असून महिला व पुरुष भाविकांसाठी स्वतंत्र व्यवस्था असणार आहे.तरी सर्व भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन बाजार समितीचे संचालक मंडळ,व्यापारी बांधव,कर्मचारी व सर्व हनुमान भक्तांनी केले आहे.
22 फुटी हनुमान मंदिरावरही जन्मोत्सव
श्री अंबरीश महाराज टेकडीवरील 22 फुटी श्री हनुमान मंदिरावर देखील जन्मोत्सव व महाप्रसाद कार्यक्रम होणार असून भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन बाविस्कर परिवार व हनुमान भक्तांनी केले आहे.
विजय मारुती मंदिरावर सत्यनारायण पूजा
अमळनेर शहरातील श्री विजय मारुती मंदिरावर आज दिनांक 2 एप्रिल रोजी सायंकाळी 4 वाजता हनुमान जन्मोत्सव निमित्त सालाबादप्रमाणे श्री सत्यनारायण महापूजा आयोजित केली आहे.तरी सर्व भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन प्रशांत उपाध्ये व परिवाराने केले आहे.




