
तसेच ढेकू येथून ८७ हजाराची पाच गुरे गेली चोरीला..
अमळनेर : तालुक्यातून गांधली येथून पेट्रोल पंपावरून अज्ञात चोरट्यानी १५ लाख रूपये किमतीचा डंपर पळवून नेला तर दुसऱ्या घटनेत अज्ञात चोरट्यांनी ढेकू येथून ८७ हजाराची पाच गुरे चोरून नेली आहेत.

निलेश संजय पाटील रा हिंगोणे याचे डंपर क्रमांक एम एच ४८ ए जी ८३०७ हे ३१ रोजी सायंकाळी गांधली येथील सप्तशृंगी पेट्रोल पंपावर लावले होते. रात्री साडे अकराच्या दरम्यान डंपर चोरी गेल्याचे समजले. निलेशने घटना पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम याना सांगितले असता त्यांनी हेडकॉन्स्टेबल मिलिंद सोनार , विनोद संदानशिव , निलेश मोरे , प्रशांत पाटील यांच्या पथकाला पाठवले.
पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक बाबी तपासल्या असता आरोपी डंपर पातोंडा मार्गे चोपडा येथून गुजरात कडे पळाल्याचे समजते. आरोपीविरुद्ध डंपर मालकाने फिर्याद दिल्यावरून चोरीचा गुन्हा दाखल करम्यात आला असून तपास पोलीस उपनिरीक्षक नामदेव बोरकर करीत आहेत.
तर तालुक्यातील ढेकू खुर्द येथील महेंद्र सयाजीराव पाटील यांच्या ढेकू बुद्रुक शिवारातील गट नम्बर ९७ मधील शेतातून १ रोजी रात्री अज्ञात चोरट्याने चार गायी एक गोर्हा असे एकूण ८७ हजाराची गुरे चोरून नेली आहेत. अमळनेर पोलिसात चोरीचा गुन्हा दाखल झाला असून तपास हेडकॉन्स्टेबल लक्ष्मीकांत शिंपी करीत आहेत.




