
अमळनेर:- शहरातील प्रभाग क्रमांक ७ मधून जाणारा आणि अनेक गावांना जोडणारा मुख्य ढेकू मांडळ रस्ता अनेक वर्षांपासून प्रलंबित होता. या रस्त्याच्या दुरवस्थेमुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत होता.
नागरिकांच्या सातत्यपूर्ण मागणीनंतर व वाढत्या त्रासाला कंटाळून स्थानिक नागरिकांनी लोकप्रतिनिधी राजू फाफोरेकर व योगिता कापडणेकर यांच्याकडे पाठपुरावा केला. त्यानंतर दोन्ही लोकप्रतिनिधींनी आमदार अनिल दादा पाटील यांच्याकडे रस्त्याचे काम तात्काळ सुरू करण्याची मागणी केली.

याची दखल घेत आमदार अनिल दादा पाटील यांनी स्वतः संबंधित रस्त्याची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी त्यांनी ठेकेदाराकडून दर्जेदार काम करून घेण्याच्या सूचना दिल्या व काम लवकरात लवकर पूर्ण करण्याबाबत शास्वती घेतली.
या पाहणीदरम्यान स्थानिक नागरिकांसह जितेंद्र मनीलाल पवार, निलेश फाफोरेकर, अशोक पाटील, सोनवणे सर, मनीष भावसार, सरपंच सुनील पवार, नितीन पाटील आदी उपस्थित होते.




