
अमळनेर : शाळेजवळ पान टपरीवर गुटखा ,तंबाखू ,बिडी सिगारेट विक्री करणाऱ्यावर अमळनेर पोलिसांनी कारवाई केली आहे.

हेडकॉन्स्टेबल सुनील तेली ,उज्वलकुमार म्हस्के , सूर्यकांत साळुंखे हे पोलीस शहरात गस्तीवर असताना ८ रोजी सकाळी साडे अकरा वाजेच्या सुमारास त्यांना गलवाडे रस्त्यावर ग्लोबल शाळेजवळ नामदेव भीमराव पाटील रा भवानी चौक ताडेपुरा हा पान टपरीवर तंबाखूजन्य पदार्थ विक्री करताना आढळून आला. पोलिसांनी त्याच्याजवळून सिगारेट तंबाखू असे साहित्य जप्त करून त्याच्याविरुद्ध सिगारेट आणि तंबाखू जन्य पदार्थ विक्री प्रतिबंध अधिनियम २००३ चे कलम ६(ब) २४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास हेडकॉन्स्टेबल सुनील तेली करीत आहेत.




