
अमळनेर:- तालुक्यातील डांगर जवळ झालेल्या दुचाकी व चारचाकीच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना ८ रोजी सायंकाळी घडली आहे.

चोपडाई कोंढावळ येथील शिवाजी भगवान सैंदाने (वय ३८, व्यवसाय गवंडीकाम) हे ८ रोजी सायंकाळी डांगर येथून चोपडाई येथे स्वतःच्या दुचाकीने जात असताना ७:३० वाजेच्या सुमारास समोरून येणाऱ्या किया सोनेट (क्रमांक एमएच १९ इजी ०५८८) वरील चालकाने धडक दिली. जखमी शिवाजी सैदाणे यांना धुळे येथे हिरे मेडिकल कॉलेजला दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले.मयताच्या भावाने दिलेल्या फिर्यादीवरून किया सोनेट वाहनाच्या चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास हेकॉ काशिनाथ पाटील हे करीत आहेत.




