
अमळनेर :- येथील श्रीराम नगरातील वैकुंठवासी गुरुवर्य मोठेबाबा स्मृती मंदिरात सालाबाद प्रमाणे संत मुक्ताबाई यांचा ७२९ वा चतुर्भुज समाधी सोहळा वैशाख व दशमी दि. १२ मे. रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

या सोहळ्याच्या निमित्ताने ह.भ.प. गुलाबराव महाराज लोणकर यांच्या सुश्राव्य कीर्तन श्रवणाचा लाभ भाविकांनी घेतला. या विशेष प्रसंगी थाळनेर येथील काशिनाथ बाबुलाल ठाकरे व लताबाई काशिनाथ ठाकरे या दांपत्याने अतिशय खडतर व अध्यात्मात पुण्यपावन असणारी नर्मदा परिक्रमा अनवाणी पायाने तीन वर्ष तीन महिने 13 दिवसात संकल्पपूर्ती केल्याबद्दल त्यांचे स्नेही श्री यशवंतराव बोरसे व सौ. संध्या बोरसे ( वेळोदे )यांच्यावतीने तसेच वैकुंठवासी गुरुवर्य मोठेबाबा स्मृती मंदिर ट्रस्ट, व देवगाव (पारोळा )व वेळोदे येथील भजनी मंडळाच्या वतीने भव्य सत्कार करण्यात आला. उपस्थित भाविकांना आमरस व पुरणपोळीचा महाप्रसाद भोजन दिले गेले. संत मुक्ताबाई अंतर्धान – तिरिभूत समाधी सोहळा किर्तन सेवेसाठी सालाबादाप्रमाणे वै.ह.भ.प. दिवाकर राहणे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ ह.भ.प श्री उमेश रहाणे व राहणे परिवार यांनी किर्तन सेवेचे यजमानपद स्विकारले. याप्रसंगी हभप सत्यवान महाराज (देवगाव ), हभप प्रकाश महाराज, अमळनेर ). हभप अरुण महाराज ( रडावण ) हभप राजू महाराज, भगवान महाराज यांच्या हस्ते देणगीदारांचा व गुणवंतांचा सत्कार करण्यात आला.कार्यक्रमासाठी मंदिर संस्थेचे उपाध्यक्ष श्री वडील साहेब विश्वस्त जे.बी आप्पा पाटील, बोरसे नाना, शिंदे नाना, मधुकर पवार,सचिव शिंदे रावसाहेब,श्री सोनवणे भाऊसाहेब,श्री ज्ञानेश्वर पाटील यांनी सहकार्य केले.भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कीर्तन श्रवणाचा लाभ घेतला.




