
अमळनेर : घराच्या छताच्या भिंतीला पाणी मारताना विजेचा शॉक लागून मजुराचा मृत्यू झाल्याची घटना १३ रोजी सकाळी साडे नऊ वाजता घडली.
बलीराम फुलसिंग बारेला वय ३८ अछाली ता सेंधवा जि बडवाणी हा सध्या अमळगाव येथे राहत असून तो खवशी येथील प्रदीप पांडुरंग पाटील यांच्या घराच्या बांधकामावर काम करत होता. सकाळी साडे नऊ वाजता तो छतावरच्या भिंतींना पाणी मारत असताना छतावरून गेलेल्या विद्युत तारांचा शॉक लागल्याने तो खाली पडला. लोकांनी त्याला ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. त्याचा चुलत पुतण्या नबी आपसिंग बारेला यांनी फिर्याद दिल्यावरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून तपास हेडकॉन्स्टेबल विजय भोई करीत आहेत.



