
अमळनेर : खासदारांच्या सभेचे चित्रीकरण करण्यासाठी दिलेल्या मोबाईल मधून तरुणीचे खाजगी फोटो व्हिडीओ व्हायरल करणाऱ्या तरुणाविरुद्ध विनयभंग सह आय टी ऍक्ट चा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निकेश उर्फ राज पाटील असे त्या तरुणाचे नाव आहे.

२६ नोव्हेंबर २०२५ रोजी अमळनेर येथे स्वामींनारायण मंदिरासमोर खासदार श्रीकांत शिंदे यांची सभा होती. यावेळी एका तरुणीने आपला मोबाईल निकेश उर्फ राज पाटील याला चित्रीकरणासाठी दिला होता. त्यामुळे त्याला मोबाईलचा पासवर्ड देखील देण्यात आला होता. त्यावेळी त्याने तरुणींच्या मोबाईल मधील खाजगी व्हिडीओचे स्वतःच्या मोबाईल मध्ये चित्रीकरण करून घेतले. जानेवारी महिन्यात अविनाश चौधरी याने तरुणीला सांगितले की तुझा अश्या प्रकारचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. त्यावेळी तरुणीने कोणते व्हिडीओ असल्याचे विचारून खात्री केली असता तिच्या मोबाईल मधील गॅलरी मधील व्हिडीओ एक तरुणाने केल्याचे सांगितले. सभेच्या फोटोंवरून निकेश उर्फ राजचा शोध घेऊन त्याच्या मोबाईल मधून व्हिडीओ डिलीट केले. घाबरून तरुणीने आपल्या आई वडिलांना सांगितले नाही. मात्र १६ मे रोजी पुन्हा तो व्हिडीओ निलेश भांडारकर यांच्या मोबाईल मध्ये आल्यानन्तर त्यांनी पीडितेच्या वडिलांना बोलावून सदरची घटना सांगितली. त्यावेळी पीडितेची खात्री झाली की तो व्हिडीओ निकेश उर्फ राज पाटील यानेच केले आहेत. पीडितेने अमळनेर पोलीस स्टेशनला फिर्याद दिल्यावरून निकेश उर्फ राज पाटील याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ७४ ,७७ सह आय टी कायदा ६५,६६ ,६६(ई) , ६७ ,६७(अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास स्वतः पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम करीत आहेत.
दरम्यान या प्रकरणात काही नावे समोर आली असून लवकरच आरोपी आणि व्हिडीओ व्हायरल करणार्यांना अटक करण्यात येईल व गय न करता कठोर कारवाई केली जाईल.-दत्तात्रय निकम , पोलीस निरीक्षक अमळनेर पोलीस स्टेशन




