
अमळनेर : तालुक्यातील धावडे येथे तापी नदी पात्रातून अवैधरित्या वाळू उपसा सुरू असून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी धावडे येथील सरपंच व ग्रामस्थांनी केली आहे.

धावडे येथे दुसऱ्याच ठेक्यावरचे वाळू ठेकेदार बोटीने चोरटी वाहतूक करीत आहेत. गावकरी बोलायला गेले असता त्यांच्या अंगावर डंपर घालतात. धावडे येथून अनेक गावांना पाणी पुरवठा केला जातो. अशा भरमसाठ प्रमाणात अवैधरित्या वाळू उपसा झाल्यास पाणीपुरवठावर परिणाम होतील. त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावे अशी मागणी तहसीलदार , उपविभागीय अधिकारी , जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे सरपंच व ग्रामस्थांनी केली आहे.




