Oplus_131072
अमळनेर : तालुक्यातील सावखेडा येथील वाळू घाटावर शासनाच्या अटी शर्तीचा भंग झाल्याने जिल्हाधिकारींच्या आदेशाने महसूल विभाग आणि पोलिसांनी संयुक्त कारवाई करत १२ बोटी , १० पोकलेन , ६ डंपर, ४८ ब्रास वाळू जप्त करून ठेकेदाराला १ कोटी ७४ लाख ४९ हजार ३४४ रुपये दंडाची कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. दरम्यान प्रशासनाच्या ठोस कारवाईमुळे अमळनेर तालुक्यातील सर्व वाळू ठेके बंद होते. सर्व डंपर रस्त्यावर व विविध ठिकाणी थांबलेले होते.
तालुक्यातील सावखेडा येथील गट क्रमांक २३९ , २५१ , २५२ , ३ व ५ च्या लगत तापी नदी पात्रात वाळू ठेका शीतल एंटर प्रायझेस ला देण्यात आलेला होता. सावखेडा येथून शासनाने ठरवून दिलेल्या अटी शर्तीचा भंग करून सर्रास बोटी व पोकलेन ने उपसा केला जात असल्याची तक्रार धावडे येथील सरपंच ऍड उमाकांत पाटील यांनी केली होती.
जिल्हाधिकारी रोहन घुघे यांच्या आदेशानुसार तहसीलदार रुपेशकुमार सुराणा यांनी वरिष्ठ अधिकारी उपविभागीय अधिकारी मयूर भंगाळे , चोपडा येथील पोलीस उपअधीक्षक आणासाहेब घोलप , आणि पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम , मंडळाधिकारी कल्याणी पाटील, प्रभारी पुरवठा निरीक्षक सचिन निकम याना व सोबत २० महसूल कर्मचारी , २० पोलीस कर्मचारी असा ताफा घेऊन संयुक्त कारवाई केली. पथकाच्या कारवाईत सावखेडा येथे नदी पात्रात बेकायदेशीर १२ बोटी आणि १० पोकलेन मशिनद्वारे वाळूचा उपसा सुरू होता. घाटावर ६ डंपर सज्ज होते. तसेच उत्खनन स्थळी डिझेलचे दहा कॅन डिझेलचे आढळून आले. पथकाने सर्व मशिनरी जप्त करून त्यांच्यावर महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमन १९६६ च्या कलम ४८ व पोट कलम ७ व ८ तसेच महाराष्ट्र शासन असाधारण भाग ४ ब , ४ जून २१ च्या तरतुदीनुसार दंडास पात्र असल्यामुळे मशिनरी ला एकूण दंडात्मक रक्कम १ कोटी ४७ लाख रुपये आणि जळगाव जिल्हा खनिज प्रतिष्ठान ची एकूण दंडाच्या १० टक्के रक्कम १४ लाख ७० हजार अशी १ कोटी ६१ लाख ,७० हजार रुपये आणि ४८ ब्रास वाळूची एकूण दंडाची रक्कम १२ लाख ७९ हजार ३४४ रुपये अशी सर्व मिळून एकत्र १ कोटी ७४ लाख ४९ हजार ३४४ रुपये दंडाची नोटीस शीतल इंटरप्रायजेस या ठेकेदाराला देऊन २४ तासाच्या आत खुलासा मागवण्यात आला आहे. मुदतीत खुलासा प्राप्त न झाल्यास आपले काही एक म्हणणे नाही असे गृहीत धरून नियमानुसार शास्तीची रक्कम वसूल करण्यात येईल असेही तहसीलदार रुपेशकुमार सुराणा यांनी नोटीसीत म्हटले आहे.
दरम्यान अमळनेर महसूल विभागाने केलेल्या धडक कारवाईमुळे पाचही ठेक्यावरील वाळू वाहतूक पूर्णपणे थांबली होती. एरवी रस्त्यावर वेगाने चालणारे डंपर ठिकठिकाणी रस्त्यावर हॉटेल , पेट्रोलपंपांवर जागीच थांबलेले आढळून आले. काही मालकांनी आपले डंपर घरीच लावून घेतले होते. वाळू ठेक्याची मुदत ९ जूनपर्यंत असली तरी काही ठेक्याची वाळू वाहण्याची क्षमता संपलेली असल्याचे सम
