अमळनेर : येथील प्रभाग आठ मधील एस टी कॉलनी ,सुंदर नगर , पार्वती नगर , बँक कॉलनी आदी भागात नगरसेविकेने जबाबदारीचे कर्तव्य चोख पार पाडल्याने सात वर्षांनी नागरिकांना सुरळीत आणि योग्य प्रमाणात पाणी मिळाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले. शहरातील पिंपळे रोड वरील प्रभाग आठ मधील शहराच्या बाहेरच्या टोकाला असलेल्या एस टी कॉलनी , सुंदर नगर , पार्वती नगर , बँक कॉलनी दोन या वस्तीत गेल्या सात वर्षांपासून पाणी पुरवठा होत नव्हता. दोन दोन तास मोटारी चालवून पाणी मिळत नव्हते. त्यात उन्हाळ्यात आठ ते दहा दिवसानंतर पाणी पुरवठा आणि वरून तापमानाचा कहर यामुळे नागरिक परेशान होते. पालिका कर्मचारी अधिकारी कोणीच लक्ष द्यायला तयार नव्हते. तांत्रिक दोषही आढळून येत नव्हता.
अखेरीस या भागातील महिलांनी नगरसेविका अपूर्वा चौधरी यांच्याकडे तक्रार केली. त्यांनी व जालंधर चौधरी यांनी नगरपालीकेकडे पाठपुरावा केला. पाईपलाईन मध्ये दोष असतील तर नवीन होणाऱ्या २४ बाय ७ च्या पाईप लाईनला जोडण्या करा आणि त्यातून नागरिकांना पाणी पुरवठा करा असा पर्याय सुचवला. गोष्ट साधी होती मात्र त्यासाठी जबाबदारी स्वीकारायला तयार नव्हते. नगरसेविका अपूर्वा चौधरी यांनी ते काम करून दाखवले. चाचणी घेण्यात आली. अखेरच्या घरापर्यंत मुबलक पाणी पुरवठा झाला. तब्बल सात वर्षांनी नागरिकांना पुरेसे पाणी मिळाल्याने त्यांनी समाधान व्यक्त केले. याकामी मुख्याधिकारी गणेश शिंदे , अभियंता सत्येम पाटील , प्रविणकुमार बैसाणे आदींचे सहकार्य लाभले.
