लोण तांडा गावाजवळ दुचाकी स्लीप झाल्याने घडली दुर्घटना…
अमळनेर:- तालुक्यातील लोण तांडा गावाजवळ दुचाकी स्लीप होवून अपघातातील एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, २६ जून रोजी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास लोण तांडा गावाच्या अलीकडे भरवस कडे जात असलेल्या दुचाकी स्लीप झाल्याने अनिल महरू पाटील रा. खंडलाय ता. जि. धुळे ह्याचा डोक्याला व छातीला जबर मार बसला होता. त्यावेळी तिथून जाणाऱ्या प्रवाशांनी अँब्युलन्स बोलवून धुळे येथे खाजगी रुग्णालयात दाखल केले होते. मात्र ४ जुलै रोजी त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. उपचार व कागदपत्रे मिळाल्यानंतर मारवड पोलीसात अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.