अमळनेर:- शहरातील पैलाड भागातील के.डी.गायकवाड माध्यमिक व उच्च माध्य. विद्यालयात इको फ्रेंडली गणपती कार्यशाळा संपन्न झाली.
जलप्रदुषणाला आळा घालत पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमुर्तीला फाटा देत पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याची मागणी सर्वच स्तरातुन जोर धरू लागली आहे. याचाच एक भाग म्हणून के.डी. गायकवाड माध्य.व उच्च माध्य. विद्यालय, अमळनेर येथे शाडूमाती पासून गणेशमुर्ती घडविण्याची कार्यशाळा घेण्यात आली.
शाडूमाती गणेशमुर्ती कार्यशाळेत विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेतला. मुख्याध्यापक ए.व्ही. नेतकर यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या कार्यशाळेत इको फ्रेंडली गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन केले. दोन दिवस भिजत ठेवलेल्या शाडूमातीचे गोळे करून विद्यार्थ्यांना देण्यात आले. कलाशिक्षक आर.बी. शेलकर, रूपाली ठाकूर,पुनम पारधी, ज्योती पाटील,मंदाकिनी लाडे, मोनीका भदाणे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी लाडक्या गणरायाच्या विविध सुबक मुद्रा साकरल्या.या प्रसंगी विद्यालयाचे पर्यवेक्षक डी.एस. पाटील,वरिष्ठ शिक्षक एम.आर. सोनवणे सर्व शिक्षक तसेच शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे अनमोल मार्गदर्शन लाभले.