अमळनेर:- येथील अमळनेर गाडी लोहार समाजाची वार्षिक सर्वसाधारण सभा १४ ऑगस्ट रोजी चंद्रकांत लोहार यांच्या श्रीकृष्ण सॉ मील येथे संपन्न झाली.
समाज मंडळाचे अध्यक्ष प्रा देविदास साधू लोहार यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा घेण्यात आली. सुरुवातीला गाडी लोहार समाजाचे आराध्य दैवत श्री भगवान विश्वकर्मा यांच्या प्रतिमेचे पूजन करून सदर सभेला सुरुवात करण्यात आली. त्याचबरोबर कोरोना महामारीत मध्ये अनेक कुटुंबांचे सदस्य दिवंगत झाले. या दिवंगत आत्म्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. त्याचबरोबर इयत्ता पहिली ते इयत्ता दहावीच्या उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा शालेय साहित्य देऊन गौरव करण्यात आला. समाजातील जे समाज बांधव सेवानिवृत्त झाले होते त्यांचा समाज मंडळाच्या माध्यमातून सन्मान करण्यात आला. गरजू समज बांधवांना मंडळाच्या माध्यमातून किराणा साहित्य वाटप करण्यात आले. अनेक विधायक कार्य समाज मंडळाच्या माध्यमातून दरवर्षी केली जात असतात.कै श्रीराम धनजी लोहार यांच्या स्मरणार्थ रमेश धनजी लोहार यांनी समाज मंडळाला पाच हजार रुपये समाज मंडळाला देणगी दिली. त्यांचा सुद्धा सत्कार करण्यात आला. सन 2022 ते 2027 या पाच वर्षासाठी समाज मंडळाची नवीन कार्यकारिणीची निवड करण्यात आली असून अध्यक्षपदी विनोद श्यामलाल पवार, उपाध्यक्ष चंद्रकांत नंदलाल लोहार, सचिव हेमकांत रामचंद्र लोहार, सदस्य अशोक मोतीराम लोहार, मनोज प्रकाश लोहार, धनंजय खंडू लोहार, संजय रामलाल लोहार, त्याचबरोबर ज्येष्ठ सल्लागार म्हणून सेवानिवृत्त प्रा देविदास सहादू लोहार, शिवाजी बाबूलाल लोहार, प्रल्हाद वेडू लोहार यांची निवड करण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्ष व समाज मंडळाचे मावळते अध्यक्ष यांनी नवीन निवड झालेल्या कार्यकारिणीचा यथोचित सन्मान केला व शुभेच्छा दिल्या. समाज मंडळाचे सचिव हेमकांत लोहार यांनी सूत्रसंचालन व आभार मानले. यानंतर राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.