करणखेडा ग्रामस्थांनी दानशूर दात्यांना केले मदतीचे आवाहन…
अमळनेर:- तालुक्यातील करणखेडा येथील १६ वर्षीय राहुलच्या यकृत प्रत्यारोपणासाठी २५ लाखाचा खर्च येणार असून दानशूर दात्यांना मदतीचे आवाहन कुटूंबीय व ग्रामस्थांनी केले आहे.
कु. राहुल संतोष पाटील रा. करणखेडा, ह. मु. पुणे याचे यकृत पूर्णतः निकामी झाले आहे. आईचे यकृत प्रत्यारोपणाकरीता 25 लाख रुपये खर्च लागणार आहे. राहुलचे वडील संतोष धोंडू पाटील यांची परिस्थिती अत्यंत हलाखीची असून ते ‘चौकीदार’ म्हणून तर राहुलची आई दुसऱ्यांच्या घरी ‘स्वयंपाक’ करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. त्यांचे बँक अकाउंट देखील नसून राहुलचे मामा निंबा सूर्यवंशी यांच्या खात्यावर मदत जमा केली जात आहे. त्यामुळे अश्या संकट प्रसंगी दानशूर दात्यांनी मदतीचा हात द्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.