
अमळनेर:- तालुक्यातील लोंढवे येथील स्व.आबासो. एस. एस. पाटील माध्य.विद्यालयात हिंदी दिवस उत्साहात साजरा झाला.
त्यानिमित्त आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक बाळासाहेब पाटील हे होते. कार्यक्रमाच्या सुरवातीला अध्यक्ष व मंचावर उपस्थित मान्यवरांचे इ.९ वीच्या विद्यार्थिनींनी स्वागत गीत गाऊन स्वागत केले.अध्यक्ष व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते हिंदी साहित्यकार प्रेमचंद यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. हिंदी दिवसाचं औचित्य साधून आयोजित हिंदी निबंध स्पर्धेत सहभागी लहान गटातील ( इ.५ वी ते ७ वी) सहभागी ३० विद्यार्थ्यांमधून प्रथम : माहेश्वरी पाटील, द्वितीय : धनश्री धनगर, तृतीय : कृतिका पाटील तसेच मोठ्या गटातील ( इ.८ वी ते १० वी ) सहभागी ७५ विद्यार्थ्यांमधून प्रथम : प्रतिक्षा पाटील, द्वितीय : सिद्धी सोनी, तृतीय : जयेश पाटील यांना मान्यवरांच्या हस्ते शालेय उपयोगी साहित्य पारितोषिक म्हणून देण्यात आले. प्रस्तावना हिंदी विषय शिक्षक दिपक पवार यांनी तर हिंदी दिवसाचे महत्त्व शाळेतील दुसरे हिंदी विषय शिक्षक मनोहर देसले यांनी स्पष्ट केले.इ. ५ वी ते १० वी तील विद्यार्थी व विद्यार्थिनींनी आपले मनोगत व्यक्त केले. अध्यक्षीय भाषणात मुख्याध्यापक बाळासाहेब पाटील यांनी ‘ हिंदीतून विविधतेत एकता ‘ या विषयी उपस्थितांना मार्गदर्शन केले. सूत्रसंचलन व आभार प्रदर्शन इ.१०वी तील योगेश्वरी पाटील व जागृती पाटील यांनी केले. कार्यक्रमास दिनेश पाटील, महेश पाटील, मिलिंद पाटील, रंगराव पाटील, दिपक वाघ,दगडू सोनवणे,भारती बहीरम,वर्षा पाटील, महेंद्र पाटील, पांडुरंग पाटील, वाल्मिक पाटील,मनोज पाटील, प्रमोद बहीरम, जगदीश पाटील उपस्थित होते.तर भगवान पाटील, अनिल पाटील, दिलीप पाटील, प्रगती पाटील यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.







