२ ऑक्टोबर रोजी अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड लावणार हजेरी…
अमळनेर:- राजमुद्रा फाऊंडेशन यांच्या वतीने या वर्षी नवरात्रोत्सवानिमित्त ” जागर स्त्री शक्तीचा – दांडिया उत्सव बक्षिसांचा ” या कार्यक्रमाचे भव्य दिव्य आयोजन ढेकू रोड परिसरात करण्यात आले असून कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेत महाराणी येसूबाई यांची भूमिका साकारलेल्या अभिनेत्री कु. प्राजक्ता गायकवाड यांची रविवार २ ऑक्टोबर २०२२ रोजी संध्याकाळी ६ वाजता कार्यक्रमाचे बक्षीस वितरणासाठी मुख्य उपस्थिती असणार आहे.
सदर कार्यक्रमात महिलांच्या विविध कलागुणांना वाव मिळावा यासाठी अनेक प्रकारच्या स्पर्धा घेण्यात येणार असून त्यात स्कुटर, सोन्याची नथ, सोन्या-चांदीच्या राजमुद्रा, पैठणी साडी, गिफ्ट हॅम्पर असे अनेक बक्षिसांचा खजिना ठेवण्यात आला असून कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाराणी येसूबाई बचत गटाच्या महिला भगिनी व राजमुद्रा फाउंडेशनचे उपाध्यक्ष अक्षय चव्हाण, तेजस पवार, दर्पण वाघ, विशाल पाटील, भूषण भदाणे, किशोर पाटील, उज्वल मोरे, मयूर पाटील, अक्षय पाटील, निनाद शिसोदे, गौरव पवार, अमोल पाटील, राहुल पाटील, अनिरुद्ध शिसोदे, शुभम पवार, कुणाल पाटील, खीलेश पवार, कुणाल चौधरी, तुषार वायकर हे प्रयत्न करत असून जास्तीत जास्त महिला भगिनींनी सहभाग नोंदवावा असे आव्हान राजमुद्रा फाऊंडेशनचे अध्यक्ष तथा नगरसेवक श्याम पाटील यांनी केले आहे.
ह्या बातम्या देखील वाचा
December 22, 2024