
अमळनेर:- शहरातील साने गुरुजी शाळा आणि अमळनेर तालुका कृषी विभाग व आत्मा यांच्या संयुक्त विद्यमाने एसएम गोरे सभागृहात रानभाजी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.

या महोत्सवात मोठ्या संख्येने विद्यार्थी, विद्यार्थिनी, पालक व बचत गटातील महिलांनी सहभाग घेतला होता. या कार्यक्रमात विद्यार्थी व विद्यार्थिनींनी स्वतः बनवलेल्या रानभाजींच्या पाककृतींची आकर्षक मांडणी सभागृहात करण्यात आलेली होती या महोत्सवातील विविध रानभाजी पासून तयार केलेल्या पाककृतीची आकर्षक रित्या केलेली मांडणी व पाककृतीची चव घेऊन उपस्थित मान्यवरांनी परीक्षण करून संस्था शाळा विद्यार्थी व विद्यार्थिनींचे कौतुक केले. अमळनेर शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव संदीप घोरपडे सर यांच्या संकल्पनेतून दरवर्षी या वनभाजी उत्सवाचे महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. यावेळी उपक्रमशील शिक्षिका मोनाली योगेश वंजारी यांचे सहकार्य लाभले. रानभाजी पाककृतीचे परीक्षण जेष्ठ शिक्षक डी के पाटील व मुकेश पाटील यांनी केले. दुपारच्या सत्रात तालुका कृषी अधिकारी भरत वारे यांनी विद्यार्थ्यांना रानभाज्यांचे महत्त्व व त्यांचा दैनंदिन जीवनातील महत्त्व असे मार्गदर्शन केले. यानंतर विद्यार्थी व विद्यार्थिनींना बक्षिसाचे वितरण करण्यात आले. या कार्यक्रमास मंडळ कृषी अधिकारी अविनाश खैरनार, कृषी पर्यवेक्षक योगेश वंजारी, प्रवीण पाटील, दीपक चौधरी, योगेश कदम, राजेंद्र पवार, व आत्माचे तालुका तंत्र व्यवस्थापक भूषण पाटिल आदी कृषी विभागाचे मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान मुख्याध्यापिका श्रीमती अनिता बोरसे यांनी भूषवले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक सुनील पाटील सर यांनी केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्या पाटील मॅडम व मुकेश पाटील यांनी केले व आभार डी के पाटील यांनी मानले. यावेळी शिक्षक प्रतिनिधी विलास चौधरी, शिक्षक जयेश पाटील व इतर मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमप्रसंगी कृषि विभागाच्या सेवा पंधरवडा साजरा करण्यात आला. त्या प्रसंगी ढेकु सीम येथील बळीराजा शेतकरी महिला बचत गटाच्या श्रीमती वर्षा पाटील व त्यांच्या सहकारी यांना गट नोदणी प्रमाणपत्र वाटप करून त्यांचा सत्कार तालुका कृषी अधिकारी l भरत वारे यांच्या हस्ते करण्यात आला. विविध प्रकारच्या रानभाजी संजय पाटील हेडावे यांनी उपलब्ध करून दिल्या व त्या विषयी विद्यार्थ्यांना त्यांची माहीती दिली.







