
कृषी विभागातर्फे ३० नोव्हेंबर पर्यंत शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शक उपक्रम सुरु…
अमळनेर:- कृषी विभागामार्फत आयोजित केलेल्या एक दिवस बळीराजासाठी कार्यक्रमाचे आयोजन तालुका कृषी अधिकारी कार्यालय मार्फत करण्यात आले आले आहे. सदर उपक्रमाव्दारे तालुक्यातील गावागावात शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात येत आहे.

तालुका कृषी अधिकारी भरत वारे याच्या मार्गदर्शनाखाली सदर उपक्रम १ सप्टेंबर पासून सुरू असून ३० नोव्हेंबर रोजी या उपक्रमाची सांगता होणार आहे. या मोहिमेत शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी त्यांचे निराकरण तसेच विविध योजनांची माहिती शेतकऱ्यांना देण्यात येत आहे. मंडळ कृषी अधिकारी अविनाश खैरनार, कृषी पर्यवेक्षक योगेश वंजारी, कदम,कृषी सहायक नलिनी पाटील, अजय पवार, निशा सोनवणे, महेंद्र पवार यांनी तालुक्यातील गावामध्ये कार्यक्रमाच्या वेळी शेतकऱ्यांना बीज प्रक्रियेचे महत्त्व रब्बी, हंगामातील बियाणे वाटप, शेतकऱ्यांना कृषी विभागाच्या योजनांची माहिती देणे, जर एखाद्या योजनेसाठी अर्ज केला असेल त्यात येणाऱ्या अडचणी, त्यांची निराकरण, पीएमएफएम योजनेचे मार्गदर्शन, स्मार्ट योजना, माती परीक्षणाचे महत्त्व, पेरणी यंत्राद्वारे लागवड करून घेणे, पिक पाहणीची महत्त्व, रोजगार हमी, फळबाग लागवड, शेतकरी मासिक आरोग्य, पत्रिका वितरण, यासारख्या व नावीन्यपूर्ण बाबीबाबत मार्गदर्शन करण्यात येत आहे. त्यातून उत्पादकता वाढीचे सूत्र तसेच सदरील गावांना आरोग्य पत्रिकेनुसार लागणारे खतांची मात्रा याविषयी माहिती देण्यात आली. आतापर्यंत निम, मारवड, ढेकूसीम, लोन चारम, करणखेडा, लोंढवे, शिरसाळे, अंतुर्ली या गावात सदर उपक्रम राबविण्यात आला असून इतर गावात 31 नोव्हेंबर पर्यंत राबविण्यात येणार आहे, असे मंडळ कृषी अधिकारी अविनाश खैरनार यांनी सांगितले आहे.







