
नंदगाव शिवारातील घटना, वनविभागाने केले अंत्यसंस्कार…
अमळनेर:- तालुक्यातील नंदगाव शिवारात कुत्र्यांच्या हल्ल्यात हरणाचे पिल्लू ठार झाल्याची घटना घडली असून वनविभागाने अंत्यसंस्कार केले आहेत.

नंदगाव लडगाव शिवारात अंबादास पाटील यांच्या शेताच्या बाजूला हरीण मेलेल्या अवस्थेत आढळून आल्याने पोलीस पाटील यांनी सदर माहिती वन विभागाला दिली. घटनास्थळी वनपाल सोनवणे, वनरक्षक सुप्रिया पाटील यांनी भेट देत ते हरिण अमळनेर येथे आणून पशु संवर्धन अधिकारी कोरे यांनी शवविच्छेदन केले. त्यानतंर वनरक्षक रामदास वेलसे व ज्ञानेश्वर पाटील यांनी त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले.







