
लोकसहभागातून उपक्रम, काल लोकार्पण संपन्न…
अमळनेर:- शहरातील स्वामी समर्थ मंदिर परिसरात लोकसहभागातून सीसीटिव्ही कॅमेरे बसविण्यात आले असून काल दिनांक २४ रोजी लोकार्पण सोहळा पार पडला.

स्वामी समर्थ मंदिर परिसर हा शहरातील गजबजलेला परिसर असून मोठ्या प्रमाणावर व्यवसायिक दुकाने, शाळा, निवासस्थाने व दवाखाने आहेत. त्यामुळे परिसराच्या सुरक्षिततेसाठी अत्याधुनिक १६ कॅमेरे डिवायएसपी राकेश जाधव यांच्या मार्गदर्शनाने लोकसहभागातून बसविण्यात आले. डॉ. विशाल बडगुजर व प्रवीण साहेबराव पाटील यांच्या हस्ते उद्घाटन पार पडले. यावेळी डिवायएसपी राकेश जाधव, दीपक पाटील, पुरुषोत्तम सूर्यवंशी, मधुकर कदम, माजी नगरसेवक विनोद कदम, राजू कोठावदे, ललित पवार, भैय्यासाहेब पाटील, डॉ. अशोक पाटील, बन्सी भेळवाले, उज्वल पाटील, दीपक काटे, जगदीश पाटील, गजेंद्र साळुंखे यांच्या परिसरातील नागरिक उपस्थित होते.या लोकोपयोगी उपक्रमासाठी अनेक दानशूर दात्यांनी आर्थिक मदत दिली असून डीवायएसपी राकेश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली यापूर्वी ही अनेक भागात सीसीटीव्ही यंत्रणा बसविण्यात आली आसून गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यास मदत होत आहेत. यावेळी दीपक मेडिकलचे संचालक दीपक पाटील यांचे मोलाचे सहकार्य लाभले.







