लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांना केले अभिवादन…
अमळनेर:- क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा क्रीडा परिषद, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय जळगाव, पंचायत समिती अमळनेर व अमळनेर तालुका क्रीडा परिषद यांच्या संयुक्त विदयमाने “राष्ट्रीय एकता दिवस” साजरा करण्यात आला.
३१ ऑक्टोबर रोजी भारत रत्न भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल जयंती निमित्त अमळनेर तहसील कार्यालयात लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेचे पुजन करुन माल्यार्पण करण्यातआले. यावेळी खेळाडू, शिक्षक, व क्रीडा प्रेमी यांनी राष्ट्रीय एकता विषयी शपथ घेतली. तसेच एकता व एकात्मता टिकविण्यासाठी ” एकता दौड (रन फॉर युनिटी) ३ कि.मी.अंतर धावून एकता टिकविण्याचा संदेश देण्यात आला. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अमळनेर पंचायत समिती ग्रामपंचायत विस्तारअधिकारी एल डी चिंचोरे,प्रमुख पाहुणे म्हणुन अमळनेर तालुका माध्यमिक संघ अध्यक्ष व क्रीडा समिती कार्याध्यक्ष संजय पाटील, मुख्याध्यापक व साने गुरुजी पंतसंस्थाचे सचिव तुषार बोरसे, मुख्याध्यापक एच आर पाटील, अमळनेर तालुका क्रीडा समन्वयक व उपाध्यक्ष जळगाव जिल्हा शा.शि.महासंघ एस पी वाघ, प्रा. ए के अग्रवाल, समिती सचिव महेश माळी, प्रा.सचिन पाटील, सहसचिव आर आर सोनवणे होते.कार्यक्रम यशस्वीतेसाठी एन डी विसपुते, एन एल पाटील (सडावण), आर एल पाटील, पी आर चौधरी (शहापुर), बापुराव सांगोरे (रणाईचे), सॕम शिंगाणे , हर्षदा सुर्यवंशी, गोकुळ बोरसे, अतुल बोरसे (अंतुर्ली), विदयापीठ व राज्य खेळाडू गिरीश रोंदळे ,राज्य खेळाडु वैभव साळी,जयेश सैंदाणे ,दर्शन भावसार ,ऋषिकेश बारी ,मुकेश बाविस्कर आदी उपस्थित होते. सुत्रसंचालन एस पी वाघ तर आभार आर आर सोनवणे यांनी मानले.