अमळनेर:- शहरातील ताडेपुरा भागात घराला आग लागून संसारोपयोगी वस्तू जळाल्या असून जीवितहानी टळली असली तरी सदर कुटुंबांची वित्तहानी झाली आहे.
सदरची घटना शॉर्ट सर्किटमुळे घडली असल्याचे सांगण्यात येत असून ताडेपुरा येथील भिमराव समरत गजरे यांचे सुमारे दीड लाखाचे नुकसान झाले आहे. या आगीत फ्रिज, टिव्ही, कपडे, धान्य, इलेक्ट्रॉनिक वस्तू, व इतर साहित्य जळून खाक झाले आहे. संबंधित कुटुंबाला मदतीसाठी शासनाने व सामाजिक संस्थांनी पुढे यावे अशी मागणी करण्यात येत आहे.