
सोशल मीडिया अध्यक्षपदी मुकेश राजपुत यांची वर्णी…
अमळनेर:- आम आदमी पक्षाच्या तालुका कार्यकारणीची निवड संपन्न झाली असून सोशल मीडिया अध्यक्षपदी मुकेश राजपुत यांची निवड करण्यात आली आहे.
महाराष्ट्राचे् राज्य सचिव धनंजय रामकृष्ण शिंदे, जळगाव जिल्हा अध्यक्ष प्रा. तुषार निकम, अमळनेर तालुकाध्यक्ष संतोष बाबुराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली 2 नोव्हेंबर रोजी तालुका कार्यकारणी जाहीर करण्यात आली. यावेळी सोशल मीडिया अध्यक्षपदी मुकेश राजपुत यांची निवड करण्यात आली असून मुकेश राजपूत जैतपिर यांनी पक्षासाठी सदैव तत्पर व प्रामाणिकपणे काम करुन संघटना वाढीवर विशेष भर देत राहील अशी ग्वाही दिली. ग्रामीण भागातील तरूण तडफदार तरुणाला संधी मिळाल्यामुळे असुन तालुका, ग्रामीण भागातून तसेच परिसरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.







