
संशयित निघाला राजस्थान राज्यातील अट्टल वाहनचोर…
अमळनेर:- संशय आल्याने अमळनेर पोलिसांनी १७ डिसेंबर रोजी शहरातून एकास ताब्यात घेतले होते. सदर संशयित अट्टल वाहन चोर निघाल्याने त्यास राजस्थान पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
दि. १७ डिसेंबर रोजी पो नि विजय शिंदे यांना माहिती मिळाली की एक संशयीत इसम सुभाषचौकातुन रेल्वे स्टेशन कडे जात आहे. त्यावरून पो ना मिलिंद भामरे, सुर्यकांत साळुंके व कपील पाटील यांनी त्यास ताब्यात घेवून नाव गाव व पत्ता विचारला असतां तो उडवा उडविची उत्तरे देऊ लागला तेव्हा त्यास पोलीस ठाण्यात आणुन सखोल चौकशी केली असतां सदर इसमाने त्याचे नाव परबतसिंग मदनसिंग भाटी रा. दहीफडा खिच्या ता. लोणी झवर जि. जोधपुर राजस्थान असे सांगितले. त्यावरुन अमळनेर पोलिसांनी राजस्थान पोलीसांशी संपर्क साधला असता सदर इसम अट्टल चारचाकी वाहन चोर आहे व त्यास राजस्थान पोलीस शोध घेत आहेत. त्याच्यावर राजस्थान येथे दि ५/१२/२०२२ रोजी भा द वि ३७९ प्रमाणे पोलीस स्टेशन झवर येथे गुन्हा दाखल असून सदर इसमावर महिन्द्रा थार गाडी चोरी केल्याबाबत गुन्हा दाखल असुन त्याने गाडी वर गोवा पासींग नंबर टाकला आहे व तो गाडी घेवून महाराष्ट्राच्या दिशेने गेला असुन स्वःताचा मोबाईल बंद करून ठेवला आहे बाबत माहिती मिळाल्याने त्यास गाडी बाबत विचारणा केली असता मध्यप्रदेश येथील महु येथे गाडी लपवली आहे असे कबूल केल्याने पो नि विजय शिंदे यांनी राजस्थान येथील पोलीसांना अमळनेर येथे बोलावून सदर इसमाला पुढील कारवाईसाठी राजस्थान पोलीसांच्या ताब्यात दिले.







