अमळनेर:- बाळासाहेबांची शिवसेना पक्षाची शहर व तालुका कार्यकारणी जाहीर करण्यात आली असून तालुक्यातील नेते व कार्यकर्त्यांना संघटनेत महत्त्वाचे स्थान मिळाले आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार व आमदार चिमणराव पाटील यांच्या नेतृत्वात अमळनेर शहरप्रमुखपदी संजय कौतिक पाटील, उपजिल्हा प्रमुखपदी महेश प्रभाकरराव देशमुख, विधानसभा क्षेत्रप्रमुख पदी सुरेश अर्जुन पाटील, तालुका संघटकपदी डॉ.दिपक पंढरीनाथ पाटील, उपतालुकाप्रमुखपदी चंद्रशेखर ताराचंद पाटील, शहर संघटकपदी साखरलाल शांताराम माळी, उपशहरप्रमुखपदी प्रविण पुरूषोत्तम पाटील, युवासेना तालुकाप्रमुखपदी गुणवंत बापुराव पाटील, युवासेना शहरप्रमुखपदी भरत प्रकाश पवार व युवासेना उपशहर प्रमुखपदी विजय उगलाल पारधी यांची नियुक्ती करण्यात आली. यावेळी आमदार चिमणराव पाटील यांनी सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सत्कार करून भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी नूतन पदाधिकारींचे अभिनंदन केले. याप्रसंगी पारोळा कृषि उत्पन्न बाजार समितीचे मा.सभापती तथा जळगांव जिल्हा बँकेचे संचालक अमोल पाटील, जिल्हाप्रमुख वासुदेव पाटील, तालुकाप्रमुख मधुकर आबा पाटील, बबलु पाटील, प्रथमेश पवार, प्रा.बी.एन.पाटील सर यांचेसह शिवसैनिक बांधव उपस्थित होते.