
प्रतापियन्सनी कुटुंबासह साजरा केला आनंदोत्सव…
अमळनेर:- धम्माल दंगामस्ती करत विनोद,गाणी सादर करून प्रताप महाविद्यालयातील १९९२ च्या वाणिज्य शाखेतील वर्गमित्रांचे स्नेहसंमेलन अंबर्षी टेकडीच्या निसर्गरम्य वातावरणात पार पडले.
महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यावर दुरावलेल्या वर्गमित्रांनी एकमेकांचा शोध घेवून तब्बल ३० वर्षांनंतर एकत्र येत गेल्यावर्षी अंबर्षी टेकडीवर स्नेह आनंद सोहळा घेतला होता. यावेळी पुन्हा आपापल्या कुटुंबासोबत स्नेहमिलन आयोजित करण्याची सामूहिक शपथ घेण्यात आली होती. त्या पार्श्वभूमीवर वचन पूर्ती करून प्रतापियन्स आपापल्या कुटुंबीयांसोबत आनंदोत्सवात सहभागी झाले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी दिवंगत वर्गमित्रांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.यावेळी दिवंगत वर्ग मित्रांच्या आठवणीने अनेकांना अश्रू अनावर झाले होते. कौटुंबिक परिचय झाल्यानंतर भाऊ विरुद्ध वहिनी असा झालेला अंताक्षरी सामना अत्यंत रंगतदार झाला. यावेळी विविध विनोद, उखाणे, गाणी व नृत्य सादर करून सर्वच वर्गमित्रांसह त्यांच्या कुटुंबीयांनी केलेला जल्लोष स्नेहमिलन सोहळ्याचे लक्षवेधी आकर्षण ठरले. कार्यक्रमाला विद्यार्थ्यांना अकाऊंट मधील बारकावे शिकवणारे बडगुजर सरांनी सपत्नीक उपस्थिती देऊन वर्गमित्रांचा उत्साह वाढविला. एकमेकांची थट्टा मस्करी करत मार्मिक चिमटे काढत भारत ससाणे यांनी केलेले सूत्रसंचालन वैशिष्ट्यपूर्ण झाले. सकाळी नाष्टा, दुपारी विविध पक्वानांवर ताव मारून पुन्हा भेटण्याचे अभिवचन देऊन वर्ग मित्रांनी जड अंतकरणाने एकमेकांचा निरोप घेतला. आनंद सोहळ्यात संजय वाणी, भारत ससाणे, अनिल पाटील, नरेश पाटील, हिरेन नागडा, अजय पोरवाल, राकेश माहेश्वरी, विपुल शहा, हरीश भदाणे, किशोर शिंपी, राजेश पाटील, प्रवीण मोराणकर, विलास परदेशी, योगेश मुंदडा, महेश लधाणी, शशी पाटील, अवचित बागुल, बाळू वाघ, राजेश जैन, संजय जैन, सुभाष महाजन, राजेश कोठावदे, संजय शिंपी, विद्या भदाणे, लता ससाणे, मुक्ता अलई(वाणी), कांचन पाटील, कविता शिंपी, कल्पना परदेशी, निपा शहा, मनीषा बागुल, उषा नागडा, रेणू लधाणी, ममता पोरवाल, भारती जैन, उषा मोराणकर, नूतन वाघ, स्वाती कोठावदे, तनु अलई, सुमित लधाणी, सौरभ मोराणकर, ओम पोरवाल, तिर्था पोरवाल, गौतम परदेशी, राहुल परदेशी यांनी विविध स्पर्धेत सहभागी होऊन धमाल दंगामस्ती करून पारिवारिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरे केले.







