
पोलीस अधीक्षकांनी प्रशंसापत्र देत केला सन्मान…
अमळनेर:- गुन्हेगारीला आळा घालत कडक कारवाई करणाऱ्या अमळनेर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विजय शिंदे व टीमचा पोलीस अधीक्षकांनी गौरव केला आहे.
दीड महिन्यापूर्वी अमळनेर पोलीस स्टेशनला चार्ज घेतेलेले वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय शिंदे यांनी गुन्हेगारांवर अतिशय कडक कारवाई करून अनेक गुन्हे उघडकीस आणले आहे. तसेच शहरात दहशत माजविणाऱ्यांना जेरबंद केले आहे.त्यामुळे अमळनेरकरांचा पोलिसांप्रतिचा विश्वास दृढ झाला आहे. जनतेकडून त्यांची प्रशंसा होत आहे. याची दखल जळगाव जिल्हा पोलीस दलाने देखील घेतली असून जळगाव जिल्हा पोलिस प्रमुख पोलीस अधीक्षक एम राजकुमार यांनी वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्री. विजय शिंदे यांनी केलेल्या एमपीडीएच्या कारवाईबाबत त्यांचा त्यांच्या टिमसह प्रशंसापत्र देवून गौरव केला. यात पोलीस हेड काॅन्स्टेबल किशोर पाटील, रविंद्र पाटील, दिपक माळी, शरद पाटील, सिद्धांत सिसोदे यांचाही पोलीस अधीक्षक यांनी प्रशंसापत्र देवून गौरव केला आहे.







