अमळनेरात कार्यकर्त्यांनी फटाके फोडून केला जल्लोष…
अमळनेर:- कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगांव विद्यापीठाच्या अधिसभेवर (सिनेट सदस्यपदी) महाराष्ट्र विधानसभेचे प्रतिनिधी म्हणून अमळनेर मतदारसंघाचे आमदार अनिल भाईदास पाटील यांची नियुक्ती झाली असून सदर नियुक्तीबद्दल विद्यार्थी कार्यकर्ते, पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आदींनी अमळनेरात फटाके फोडून जल्लोष साजरा केला.
सदर नियुक्ती बद्दल महाराष्ट्र विधिमंडळ सचिवालयाचे उपसचिव शिवदर्शन साठघे यांचे पत्र नुकतेच विद्यापीठासह आमदारांना प्राप्त झाले आहे.महाराष्ट्र विधानसभा यांचेकडून महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम 2016 च्या कलम 28 (2)(ब) अन्वये कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या अधिसभेवर विधानसभेचे प्रतिनिधी म्हणून दोन सदस्यांचे नामनिर्देशन करण्यात येते. याआधी जळगाव जिल्ह्यातून पाचोऱ्याचे आमदार किशोर पाटील यांची नियुक्ती झाली असून आता आमदार अनिल पाटील यांची नियुक्ती विधिमंडळाने केली आहे.
दरम्यान आमदार अनिल पाटील हे नेहमीच विद्यार्थी हितासाठी प्रयत्नशील राहिले असून विद्यापीठ व कॉलेज संदर्भात त्यांना विशेष अभ्यास राहिला असल्याने त्यांच्या नियुक्तीचा विद्यार्थ्यांना फायदाच होणार आहे. त्यांच्या नियुक्तीची माहिती मिळताच विद्यार्थ्यांनी खूपच आनंद व्यक्त केला.तर जिल्हाभरातून विद्यार्थी, लोकप्रतिनिधी आणि राजकीय व शैक्षणिक क्षेत्रातील मंडळींनी त्यांचे अभिनंदन केले.
यावेळी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष भूषण भदाने, राष्ट्रवादी विद्यार्थी प्रदेश संघटक सुनील शिंपी, राष्ट्रवादी युवक उपाध्यक्ष यतीन पवार, तालुकाध्यक्ष विद्यार्थी राष्ट्रवादी काँग्रेस सनी गायकवाड, शहराध्यक्ष विद्यार्थी राष्ट्रवादी काँग्रेस अनिरुद्ध सिसोदे, महारू पाटील, नरेंद्र पाटील, अशोक पाटील, बंडू नाना पाटील, प्रविण पाटील यासह विद्यार्थी व कार्यकर्ते उपस्थित होते.