
अमळनेर:- येथील प्रेरणा पाटील या विद्यार्थिनीने एमएचटी सीईटी परीक्षेत पिसीबी ग्रुपमध्ये ९९.१९ टक्के गुण मिळवले आहेत.
राज्यातील अभियांत्रिकी, कृषी, औषधनिर्माणशास्त्र या अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्यासाठी घेण्यात आलेल्या सामाईक प्रवेश परीक्षेचा अर्थात एमएचटी सीईटी 2023 चा निकाल सोमवारी जाहीर करण्यात आला असून यात अमळनेरच्या प्रेरणा अरविंद पाटील या विद्यार्थिनींने सी ई टी परीक्षेत 99.19 टक्के गुण मिळवले आहेत. तिने फिजिक्स मध्ये 99.01 तर केमिस्ट्री मध्ये 99.32 तर बायोलॉजी मध्ये 98.31 असे गुण मिळवले आहेत. प्रेरणा पाटील हिचे वडील अरविंद हे शेती करतात तर आई कल्पना पाटील या ग्रामसेविका आहेत. प्रेरणाने मिळवलेल्या यशाबद्दल तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.







