
विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ देवून केले शाळेत स्वागत…
अमळनेर:- शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या दिवशी तालुक्यातील विविध शाळांमध्ये प्रवेशोत्सव साजरा करत विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देवून शाळेत स्वागत करण्यात आले.

लोकमान्य शिक्षण मंडळ संचलित नवीन मराठी शाळेत प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला. या प्रसंगी संस्थेचे उपाध्यक्ष प्रा. डी. डी. पाटील सर व संस्थेचे चिटणीस विवेकानंदजी भांडारकर सर व नवीन मराठी शाळेचे नवनियुक्त मुख्याध्यापक मच्छिंद्र हिलाल मोरे यांच्याहस्ते विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ देत शाळेत स्वागत करण्यात आले. तसेच संस्थेचे उपाध्यक्ष प्रा श्री.डी डी. पाटील सर यांनी विद्यार्थ्यांना व उपस्थित पालकांना मार्गदर्शन केले तसेच संस्थेचे उपाध्यक्ष प्रा. डी. डी. पाटील, चिटणीस विवेकानंदजी भांडरकर व नवीन मराठी शाळेचे मुख्याध्यापक मच्छिंद्र हिलाल मोरे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात आले. यावेळी शाळेतील शिक्षक किरण ठाकूर, अतुल भोई, मकरंद निळे, उज्वल मार्कंडेय, विनीत कुलकर्णी, रुपाली पांडे मॅडम, श्रीमती संगीता पवार, जितेंद्र बेडसे, संदीप शिसोदे, मनोरे मॅडम,पोळ मॅडम, विधाते मॅडम,शिंदे मॅडम, निकिता पवार मॅडम व शिक्षकेतर कर्मचारी प्रसाद जोशी ,गांगुर्डे बाई व कविता पवार ह्या उपस्थित होत्या.
जी.एस.हायस्कूल मध्ये प्रवेशोत्सव साजरा…
शहरातील खानदेश शिक्षण मंडळ संचलित जी.एस. हायस्कूल मध्ये शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी (१५ जून) विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी गुलाबपुष्प देऊन विद्यार्थ्यांचे व पालकांचे स्वागत करण्यात आले.यावेळी विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात आले. यावेळी मुख्याध्यापक बी.एस. पाटील, उपमुख्याध्यापक सी.एस. पाटील, पर्यवेक्षक एस.बी. निकम, जेष्ठ शिक्षक डी.एम. दाभाडे, सी.एस. सोनजे, एस.आर. शिंगाणे, के.पी.पाटील,जेष्ठ लिपिक शाम पवार तसेच शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
द्रौ.रा.कन्या शाळेत प्रथम दिनी प्रवेशोत्सव साजरा…
शहरातील द्रौ. रा. कन्या शाळेत प्रथम दिनी विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी प्रथम इयत्ता ५ वी व प्रत्येक वर्गात नवीन प्रवेशित विद्यार्थ्यांसह सर्व विद्यार्थ्यांना गुलाब पुष्प, पाठ्यपुस्तके देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. याप्रसंगी मुख्याध्यापिका एस.एस. सूर्यवंशी, पर्यवेक्षक व्ही.एम.कदम,शाळेचे शिक्षक प्रतिनिधी साखरलाल महाजन, श्रीमती एस.पी.बाविस्कर,श्रीमती आर.एस. सोनवणे, श्रीमती बी.एस.पाटील, डि.एन. पालवे,जे.व्ही.बाविस्कर उपस्थित होते. शाळेच्या प्रथमदिनी अहिल्याबाई होळकर पुरस्कार प्राप्त शिक्षिका ललिता दिनेश पालवे यांचाही सत्कार करण्यात आला. शालेय परिसरात सर्वत्र रांगोळ्यांनी व फलक लेखनाने सजावट केलेली होती.सकाळ दुपार विभागाचे सर्व शिक्षक-शिक्षिका व शिक्षकेत्तर कर्मचारी बंधू-भगिनी यांनी परिश्रम घेतले.







