वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन, कार्यकर्त्यांची जोरदार तयारी…
अमळनेर:- भूमिपुत्र नामदार अनिल पाटील यांचे आज वाढदिवसाच्या निमित्ताने व कॅबिनेट मंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर अमळनेर नगरीत आगमन होणार असून त्यांच्या स्वागतासाठी कार्यकर्त्यांनी जोरदार तयारी केली आहे.
खानदेशातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे एकमेव आमदार अनिल भाईदास पाटील यांची कॅबिनेट मंत्रीपदी वर्णी लागल्यानंतर वाढदिवसाचे औचित्य साधत ७ जुलै रोजी अमळनेर येत आहेत. सकाळी पावणे सात वाजता त्यांचे जळगाव रेल्वे स्थानकावर आगमन होणार असून त्यानंतर धरणगाव, लोणे भोणे, म्हसले, टाकरखेडा, चांदणी कुर्हे याठिकाणी ग्रामस्थांतर्फे त्यांचे ठिकठिकाणी स्वागत करण्यात येणार आहे. पुढे सती माता मंदिरावर आशीर्वाद घेवून ताडेपुरा, पैलाड येथे स्वागत स्वीकारून सकाळी १० वाजेच्या सुमारास मंगळग्रह मंदिरावर आरती करणार आहेत.
मंगळ ग्रह मंदिरापासून मिरवणुकीस प्रारंभ होवून फरशी रोड, दगडी दरवाजा, राणी लक्ष्मीबाई चौक, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करत, पुढे सुभाष चौक, नगरपालिका मार्गे पाच पावली मंदिर आवार तसेच बस स्थानक व टॅक्सी स्टाफ तर्फे सत्कार स्वीकारत रेस्ट हाऊस तसेच राजभवन येथे स्वागत स्वीकारून दुपारी एकच्या सुमारास निवासस्थानी आगमन होणार आहे. सायंकाळी पाच वाजता कृषी उत्पन्न बाजार समितीत त्यांची लाडूतूला होईल. व पुन्हा निवासस्थानी परततील.व निवासस्थानी उशिरापर्यंत कार्यकर्त्यांच्या भेटी घेत शुभेच्छा स्वीकारतील. या निमित्ताने पदाधिकारी आणि कार्यकर्ते तसेच ना. पाटील यांच्या समर्थकांत उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून गावागावात शुभेच्छांचे बॅनर लागले आहेत.